तूर लागवडीत 14 टक्के घट

कृषिकिंग: यंदा देशातील तूर लागवड क्षेत्रात सुमारे 14 टक्के घट झाली आहे. प्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये मॉन्सूनच्या पावसाने सुरूवातीच्या टप्प्यात ओढ दिल्यामुळे लागवडीवर परिणाम झाला आहे. कृषी मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात 28.6 लाख हेक्टर क्षेत्रावर तुरीची लागवड झाली आहे. तुरीचे सरासरी लागवड क्षेत्र 43 लाख हेक्टर आहे. झारखंड आणि उत्तर प्रदेश वगळता इतर बहुतेक सर्व राज्यांत तुरीचा पेरा घटला आहे.
तूर उत्पादनात महाराष्ट् देशात पहिल्या क्रमांकावर आहे. राज्यात यंदा 10 लाख हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत क्षेत्र 3.7 टक्के घटले आहे. कर्नाटकात तुरीची लागवड गेल्या वर्षीच्या 8 लाख 76 हजार 600 हेक्टर क्षेत्रावरून यंदा 6 लाख 40 हजार 200 हेक्टरवर घसरले आहे. मध्य प्रदेशात तुरीच्या लागवडीत 17.8 टक्के घट झाली आहे.
केंद्र सरकारने यंदाच्या हंगामासाठी तुरीच्या किमान आधारभूत किंमतीत 125 रूपयांची वाढ करून प्रति क्विंटल 5800 रूपये जाहीर केली आहे.

Read Previous

पावसामुळे दुध उत्पादन वाढण्याची शक्यता

Read Next

राज्यात वनशेतीला प्रोत्साहन देण्यासाठी योजना