संतुलीत पशुआहारातील पाण्याचे महत्व

कृषिकिंग: संतुलित पशुआहाराचा एक मुख्य घटक म्हणजे पिण्याचे पाणी. हे पाणी पशूंना (कोणत्याही वयाच्या) तहान लागल्यावर त्यांच्या समोर किंवा १५-२० पावले (मुक्त संचार गोठ्यांमधील सोय) चालल्यावर मिळावयास पाहिजे. पशुपालकाने ठरवलेल्या वेळी पिण्यास पाणी देणे हे योग्य नाही. त्यामुळे नको असताना एकाच वेळी भरपूर पाणी प्यायले जाऊन कोठी पोटातील आम्लता बिघडते. ३०/४० लिटर पाणी प्यायल्यावर दुध तयार करणाऱ्या गायी म्हशींच्या कोठी पोटाची हालचाल २/३ तास फारच मंद गतीने चालते, रवंथ करण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे कोठी पोटातील अॅसिडीटी वाढते.
संतुलित आहारचे इतर घटक- चारा, पशुखाद्य, जास्तीचे खनिज मिश्रण व जीवनसत्वे, मळी, अपारंपरिक खाद्य पदार्थ, काही पूरक खाद्ये.

-डॉ.वासुदेव सिधये
मो. ९३७०१४५७६०.

Read Previous

पूरग्रस्त गावांच्या स्वच्छतेसाठी पाच कोटींचा निधी

Read Next

ऊस सल्ला: आडसाली उसाला खताची दुसरी मात्रा द्या