संतुलीत पशुआहारातील चाऱ्याचे महत्व

कृषिकिंग: संतुलीत पशुआहारात चाऱ्याचे महत्व फार मोठे आहे. निसर्गाने रवंथ करणारे प्राणी मुद्दाम निर्माण केले कि ज्यामुळे त्याच्या आहारात चारा ह्या शब्दाला जास्त महत्व येईल.
चाऱ्याची आहारात गरज का असते?
-कोठी पोटाच्या हालचाली करता (आकुंचन/ प्रसरण) उत्तेजन मिळते त्यामुळे कोठी पोटातील पचलेला आहार पुढे आतड्यात जायला मदत होते.
-चाऱ्यामुळे रवंथ करण्याच्या प्रक्रियेला तसेच जास्तीत जास्त लाळ तयार करण्याला उत्तेजन मिळते.
-चाऱ्यामुळे (आनुवंशिकते नुसार) दुधातील फॅटचे प्रमाण निश्चितपणे वाढते व त्याचे सातत्य रहाते.
-दुध तयार करणाऱ्या गायी/ म्हशींना त्याच्या एकूण मिश्रित आहाराच्या ३५ ते ४५ टक्के तरी चारा दिला पाहिजे.
-गायी/ म्हशी/ शेळ्यांना सर्वात स्वस्त आहार हा चाऱ्यातून मिळत असतो.
-चाऱ्यामध्ये कॅल्शीयम, पोटॅशियम व सूक्ष्म खनिजे ही पशुखाद्यापेक्षा जास्त असतात.
चाऱ्यामध्ये विरघळणारी जीवनसत्वे जास्त असतात. द्विदल चाऱ्यात बी ग्रुप जीवनसत्वे भरपूर असतात.
– डॉ. वासुदेव सिधये
मो. ९३७०१४५७६०.

Read Previous

शेताच्या बांधांवर वृक्षलागवडीसाठी समिती स्थापन

Read Next

कापूस सल्ला: डवरणी करून पाणी जमिनीत मुरवा