संकरीत जनावरांचे आहार नियोजन

कृषिकिंग: संकरीत जनावरांना आहार पुरावितांना खालील बाबी लक्षात ठेवाव्यात:
१) वर्षभर नियमित चारा मिळेल याची खात्री करावी.
२) हिरवा अथवा कोरडा चारा कुट्टी करूनच जनावरांना द्यावे त्यातून ३० टक्के चाऱ्याची बचत होते.
३) पशुखाद्यावर प्रक्रिया करूनच जनावरांना द्यावे.
४) शरीरवजन, वय, दूध उत्पादन व प्रजनन अवस्था यांचा विचार करूनच योग्य प्रमाणात आहार द्यावा.
५) अधिकचा आहार देऊन जनावरांच्या दूध उत्पादनात वाढ करून आणणे व प्रत्येक जनावरांच्या आहाराकडे लक्ष पुरविणे.
६) कमी खर्चात जास्त पोषणमुल्ये असलेला आहार पुरविणे.
७) पशुखाद्य आणि चाऱ्याची नियमित तपासणी करून घ्यावी.
८) नियमित स्वच्छ, थंड व रोगजंतूविरहित पिण्याचे पाणी द्यावे.
जनावरांना आहार पुरविण्यासाठी गरजेनुसारयांत्रिकीकरण पद्धत अवलंबावी

-डॉ. नितीन मार्कंडेय,
पशुवैद्यकीय महाविद्यालय, परभणी.

Read Previous

ऊस सल्ला : पांढरी माशी नियंत्रण उपाय

Read Next

रेशन दुकानांतून फोर्टिफाईड भाताचे वाटप करणार