संकरित गाय नोंदणी पद्धती

कृषिकिंग: सर्वप्रथम आपल्या गायीच्या कानाला नंबरचा टॅग मारून घ्यावा. यामुळे गायीची नोंद ठेवली जाऊ शकते. कृत्रिम रेतन करण्यासाठी ज्या वळूचे वीर्य वापरले जाते, त्या वळूचे नाव अथवा क्रमांक त्या कांडीवर असतो. कृत्रिम रेतन केल्यानंतर त्या वळूचा क्रमांक, नाव व ज्या गायीला रेतन केले तिचा क्रमांक सदरच्या तारखेला लिहून ठेवावा. एकदा एका गायीला वापरलेला वळू पुन्हा तिच्या पैदासीतील कालवडींना वापरू नये. दर वेळेस नवीन पिढीला नवीन वळूचे वीर्य वापरावे. एखाद्या गायीच्या पोटी जन्माला आलेला वळू त्याच गायीच्या पुढील पिढ्यांमध्ये वापरला जाऊ नये. जर सर्व दूध उत्पादकांनी या नियमांचे पालन केले तर तयार होणाऱ्या नवीन पिढीतील गायी कमीतकमी १० ते २० टक्के उत्पादन वाढवून देतील व चांगल्या संकरित गायींची पैदास होईल.

-डॉ. शैलेश मदने,
डेयरी फार्म सल्लागार.

Read Previous

लिंबूवर्गीय पीक सल्ला: फळे काढणी व टिकवण

Read Next

राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरण, ७६ नेत्यांवर गुन्हा दाखल