शेळ्यांचा आहाराची उद्दिष्ट भाग-१

शेळ्यांची ऊर्जेची गरज हि कर्बोदके व फॅट यातून भागवली जाते. मिनरल्स हि शारीरिक प्रक्रियांसाठी फार महत्वाची असतात. वजनवाढी साठी व दुधउत्पादनासाठी लागणारी कॅलशिअम सारख्या मिनरल्स ची मात्रा पण वेगळी असू शकते.

शेळ्यांना द्यावयाच्या आहारामध्ये हिरवा चारा, सुका चारा, व खुराक असे चाऱ्याचे वर्गीकरण होते. व यातूनच सर्व महत्वाची जीवनसत्वे दिली जातात. एकूण आहारामधील कोरडा भाग (ड्राय मॅटर) हा खूप महत्वाचा असतो. चाऱ्यामधील सर्व पाणी काढून घेतल्यानंतर राहिलेल्या भागाला कोरडा भाग असे म्हंटले जाते. जीवनसत्व हि कोरड्या भागात साठवलेली असतात. या कोरड्या भागाचे प्रमाण हे प्रत्येक प्रकारच्या चाऱ्या मध्ये वेगळे असते, जसा कि लुसलुशीत हिरव्या चाऱ्यामध्ये ८० ते ९० टक्के पाणी असते त्यात कोरडा भाग १० ते २० टक्के असतो. तर सुक्या चाऱ्यामध्ये फक्त १० टक्के पाणी असते व कोरडा भाग जवळपास ९० टक्के असतो, शरीराच्या सर्व गरजा या चाऱ्यातील कोरड्या भागावर अवलंबून असतात. त्यानुसारच आहाराचे व्यवस्थापन करावे लागते.

*स्त्रोत: पॉवरगोठा*

Read Previous

दुष्काळी भागाला पुराचे पाणी देणार

Read Next

लोकांच्या आग्रहाखातर नाणार बद्दल फेरविचार