शेळीपालनात नोंदवहीचे महत्त्व

कृषिकिंग : शेळीपालन हा व्यवसाय नफ्यात करावयाचा असेल, तर गोठाबांधणीसाठी कमीत कमी खर्च व स्वतःचा चारा तयार केल्यास हा व्यवसाय उत्तम आहे. शेळीपालनामध्ये वेगवेगळ्या गोष्टींच्या नोंदीसाठी विशेष महत्त्व आहे. शेळीपालनामध्ये तक्त्यांनुसार विविध नोंदी ठेवणे खूप आवश्‍यक आहे. जर शेळीपालकांनी नोंदी ठेवल्या तर तो शेळीपालन व्यवसाय नफ्यात आल्याशिवाय राहत नाही.

भारतात शेळीला गरिबांची गाय म्हणतात. विशेषतः ग्रामीण भागातील ७० टक्के गरीब महिला, सुशिक्षित बेरोजगार, अल्पभूधारक, मजूर व भूमिहीन लोक हा व्यवसाय किफायतशीरपणे करतात. भारतात शेळीच्या जवळपास २० जाती आहेत. त्यामध्ये जमुनापारी, सिरोही, सुरती आणि महाराष्ट्रातील उस्मानाबादी व संगमनेरी शेळ्या या जातींना विशेष महत्त्व आहे.

शेळीपालनामध्ये चांगला व सकस चारा उपलब्ध झाल्यास शेळी २ वर्षांत ३ वेळा विते. २ करडे देणाऱ्या शेळ्यांना विशेष महत्त्व आहे. बोकडाच्या मटणासाठी धार्मिक बंधने नाहीत. चांगल्या प्रतीचे मटण, दूध, खत (लेंडीखत) व कातडी इत्यादी उत्पन्न मिळते. शेळीला १२-१५ चौ. फूट जागा व करडास ७-८ चौ. फूट बंदिस्त जागा व २५ चौ. फूट मोकळी जागा आवश्‍यक असते.

आपल्याला जर शेळीपालन हा व्यवसाय नफ्यात करावयाचा असेल, तर गोठाबांधणीसाठी कमीत कमी खर्च व स्वतःचा चारा तयार केल्यास हा व्यवसाय उत्तम आहे. शेळीपालनामध्ये वेगवेगळ्या गोष्टींच्या नोंदीसाठी विशेष महत्त्व आहे. जर आहाराच्या नोंदी, पिलांच्या नोंदी, गाभणकाळाच्या नोंदी व इतर नोंदी जर आपण ठेवू शकलो नाही तर हे शेळीपालन व्यवसाय तोट्यात नेणारे प्रमुख कारण मानले जाते.

शेळीपालनामध्ये किंवा कोणत्याही पशुपालन व्यवसायामध्ये नोंदवही नसणे ही एक चिंतेची बाब म्हणण्यास काहीही हरकत नाही.

नोंदवहीचे महत्त्व व प्रमुख कारणे
१) अपेक्षित वंशावळीची मादी व नर ओळखण्याकरिता.
२) शेळी व्यवस्थापनेमध्ये –
शेळीची उत्पादनक्षमता चाचणी.
अनुवंश व पैदाशीसाठी नर व मादी निवड.
औषधोपचार नोंदी.
शास्त्रोक्त शेळीपालन व प्रक्षेत्र व्यवस्थापन.
३) शेळीपालनातील उत्तम व निकृष्ट शेळ्या निवडून निकृष्ट प्रक्षेत्रामधून काढून टाकणे.
४) जर सर्व नोंदी असतील तर एखाद्या अडचणीवर मात करून शेळीचे उत्पादन वाढविण्यासंबंधी त्वरित निर्णय घेता येतो.
५) शेळीपालनामध्ये पुढे दिलेल्या वेगवेगळ्या तक्त्यांनुसार विविध नोंदी ठेवणे खूप आवश्‍यक आहे. जर पुढे दिल्याप्रमाणे शेळीपालकांनी नोंदी ठेवल्या, तर तो शेळीपालन व्यवसाय नफ्यात आल्याशिवाय राहत नाही.

स्त्रोत – विकासपिडिया

Read Previous

मॉन्सूनचा परतीचा प्रवास ५ ऑक्टोबरनंतर

Read Next

नाशिक मधून दिल्ली सरकार करणार कांदा खरेदी