शेळीपालनात निरीक्षणाचे महत्व

कृषिकिंग : शेळीपालनात व्यवस्थापनासोबतच निरीक्षण करणे आवश्यक आहे त्यामुळे आपल्या अनुभवात भर पडते. शेळ्यांजवळ थोडा वेळ जरी घालवला तरी त्या जवळ येतात, त्यांचे पाठीवरून, मानेवरून हात फिरवल्यास त्यांचे शरीरस्वास्थ्य ओळखू येतात. शेळी जेवढी जादा वेळ रवंथ करत तेवढी तिची तब्बेत ठणठणीत आहे हे लक्षात येते. हिरवा चारा जास्त प्रमाणात खाल्ल्यास सायंकाळी पातळ हगवण होण्याचे प्रमाण वाढते. मोठ्या शेळ्यांचेही दरमहा वजन घेणे आवश्यक आहे, त्यामुळे चारा कसा आहे, त्याचे वजनात किती वाढ होते किंवा सर्वसाधारण आरोग्य कसे राहते याचे निदान करता येईल. एखादी शेळी मलूल झालेली दिसल्यास तत्काळ तिचे कानाच्या मुळाजवळ धरल्यास जादा गरम लागल्यास तिला ताप आहे किंवा नाही हे कळू शकते. यावेळेस अशा शेळ्यांना वेगळे काढून उपचार करावा. खाद्यात नेहमी थोडे बी कॉम्प्लेक्स मिसळत जावे, शिवाय अॅग्रोमिन पावडर घालावे, मिनरल्सच्या विटा टांगून ठेवाव्यात.

योनीतून स्त्राव होतो काय? कसा रंगाचा होतो? शेण कसे आहे यावरून शेळीच्या प्रकृतीविषयी अभ्यास होतो. गव्हाण रोज रिकामी करावी, उरलेला चारा तपासून बघावा योग्य वाटल्यास नवीन चाऱ्यात मिसळून घ्यावा अन्यथा खताच्या कुंडीत टाकावा. गव्हाण औषधाने पुसून घ्यावे व कोरडे झाल्यावरच त्यात नवीन चारा टाकावा. गव्हाणीच्या आत दर पंधरा दिवसांनी चुना मारावा.

-डॉ. गोविंदराव लोखंडे, माजी उपायुक्त, पशुसंवर्धन.

Read Previous

कापसाला १ हजार बोनस द्या – विजय जावंधिया

Read Next

असे करा रांगडा कांद्यावरील फुलकिडे व पानावरील रोगांचे नियंत्रण