शेती क्षेत्रातील बुडीत कर्जाचे प्रमाण वाढले

कृषिकिंग: शेती क्षेत्रामधील बुडीत कर्जांचे प्रमाण वाढत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे ग्रामीण अर्थकारण आणि बॅँकांची आर्थिक प्रकृती बिघडण्याचे संकेत मिळाले आहेत.
बॅंकांच्या पहिल्या तिमाहीचे आकडे बघितले तर शेती क्षेत्रामधील बुडीत कर्जाच्या प्रमाणात गेल्या वर्षीच्या तुलनेत सरासरी तीन टक्के वाढ झाली आहे. बॅंकनिहाय बुडीत कर्जाचे प्रमाण वेगवेगळे आहे. भारतीय स्टेट बॅंकेने यंदा बुडीत कर्जाचे प्रमाण 13.08 टक्के नोंदवले आहे. गेल्या वर्षी 11.6 टक्के कर्जे बुडीत होती. कॅनरा बॅंकेने यंदा 5.7 टक्के बुडीत कर्जाचे प्रमाण जाहीर केले आहे. गेल्या वर्षभराच्या काळात शेतीसाठीचा कर्जपुरवठा आधीच्या वर्षाइतकाच कायम असतानाही बुडीत कर्जाचे प्रमाण वाढलेले आहे, हे विशेष.
सार्वजनिक क्षेत्रातील बॅँकांप्रमाणेच खासगी बॅंकांचेही शेती क्षेत्रातील बुडीत कर्जांचे प्रमाण वाढले आहे. आयसीआयसीआय बॅंकेने पहिल्या तिमाहीत एकूण 1511 कोटी रूपयांचे बुडीत कर्ज नोंदवले आहे. त्यापैकी 452 कोटी रूपयांचे कर्ज किसान क्रेडीट कार्डाशी संबंधित खात्यांतील आहे. विविध राज्यांनी जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनांमुळे हा फटका बसल्याचे बॅॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान, निवडणुका आणि कर्जमाफीची अपेक्षा यामुळे कर्ज परतफेडीची संस्कृती बिघडली आहे, असे मत भारतीय स्टेट बॅँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Read Previous

शेतीकामांसाठी यंत्रमानवांचा वापर वाढणार

Read Next

जनावरांच्या व्यवस्थापनाचा दुधातील फॅट आणि डिग्रीवर होणारा परिणाम