वेलवर्गीय भाजीपाला पिकांचे व्यवस्थापन आणि काढणी

कृषिकिंग: वेलवर्गीय वर्गात मोडणा-या काकडी, दुधी भोपळा, कारली, शिरी दोडका, चोपडा दोडका इत्यादी पिकांची लागवड होऊन किमान 60 दिवस झालेले असावे. म्हणून अशा पिकास हेक्टरी 25 किलो उर्वरीत नत्राचा हप्ता बांगडी पध्दतीने दयावा. मंडप पध्दतीत पिकाच्या वेलांचे शेंडे एकमेकांत गुंतणार नाही याची काळजी घ्यावी. दोन पाण्याच्या पाळीतील अंतर जमिनीचा मगदूर व वातावरणातील तापमान यावर अवलंबून असल्याने खूप जास्त किंवा कमी पाणी देण्याचे टाळावे. दोन ओळीतील जागा तणविरहीत ठेवावी. काढणी करतांना बाजारपेठेला आवश्यक असणारी प्रत लक्षात घेऊन वरचेवर काढणी करावी. जून झालेली किंवा कमी परिपक्व असणारी फळे बाजारपेठेत नेल्यास दर मिळत नाही.

-डॉ. एस.एम. घावडे,
मिरची व भाजीपाला संशोधन विभाग,डॉ.पं.दे.कृ.वि.अकोला.

Read Previous

वासरे ढेरपोटक होण्यामागची कारणे

Read Next

मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प अव्यवहार्य