वासरे ढेरपोटक होण्यामागची कारणे

कृषिकिंग: एक गैरसमज आहे की जंत झाले की वासरे ढेरपोटे होतात. पण हे तितकेसे खरे नाही. साधारपणे वासरांचे दूध एकदम बंद होवून त्यांना चारा / पेंड / खाद्य दिले जाते अशावेळी ते भरपूर खाते. बांधलेले असल्यामुळे व्यायाम होत नाही. पोटाचे स्नायु हे बळकट नसल्यामुळे त्यांचे स्थिती स्थापकल्प कमी असते तसेच त्यावेळी रवंथ करणे ही क्रियाही भरपूर प्रमाणात नसते त्यामुळे खाल्लेला आहार बराच काळ पोटात साठून राहतो. त्यामुळे त्याचे आकारमान मोठे होते व अंकुचन पावत नाही. तसेच प्रथिने नसलेला नायट्रोजन (ज्याला एनपीएन म्हणतात) असलेली रसायने ही कंपन्यांच्या पशुखाद्यात घातलेली असतात. ही रसायने ह्या वासरांना पचविता येत नाहीत. ती मोठ्या पोटात गेल्यामुळे त्यामध्ये प्यायलेले पाणीसुद्धा साठवून ठेवण्याची प्रक्रिया सुरू होते व पोट सुटून ते ढेरपोटक तसेच लांब केसांचे होते.

लेखक- डॉ.वासुदेव सिधये
मो. ९३७०१४५७६०.

Read Previous

लिंबूवर्गीय पीक सल्ला: रसशोषक पतंग नियंत्रण उपाय

Read Next

वेलवर्गीय भाजीपाला पिकांचे व्यवस्थापन आणि काढणी