वासरास खाद्य देतांना काळजी घ्या…

कृषिकिंग: दिवसाचे 14 ते 16 तास रवंथ करणाऱ्या मोठ्या पशुंनाच बाजारातील कंपनीने तयार केलेले पशुआहार द्यावे, वासरांना हे खाद्य अजिबात देऊ नये. वासरे सहा ते सात महिन्यांची होईपर्यंत मोठ्या जनावरांना द्यावयाचे खाद्य तसेच सरकीची पेंड वासरास खाण्यास देऊ नये. मोठ्या पशुच्या खाद्यात प्रथिनांचे प्रमाण संतुलित करण्याकरिता काही रसायने मिसळली जातात. मुख्यता त्यात एन पी एन घातले जाते जे वासराला पचविता येत नाही.त्यातून निघणारा अमोनिया व इतर वायू वासराला विषकारक ठरतात. ही रसायने न पचल्यामुळे ती मोठ्या पोटात जातात त्यामध्ये प्यायलेले पाणी सुद्धा साठवून ठेवण्याची प्रक्रिया सुरू होते व पोट सुटून वासरे ढेरपोट होतात.
साधारणपणे वासराचे दूध एकदम बंद होऊन त्यांना चारा/पेंड/खाद्य दिले जाते. वासरू हे खाद्य भरपूर प्रमाणात खातात. वासरे बांधलेले असल्यामुळे त्यांचा व्यायाम होत नाही. वासरांच्या पोटाचे स्नायु बळकट नसतात तसेच त्यांची रवंथ क्रियाही भरपूर प्रमाणात होत नाही, खाल्लेला आहार बराच काळ पोटात साठून राहतो. त्यामुळे वासरांना पचेल असा उपयुक्त व हलका आहाराच त्यांना द्यावा.

Read Previous

द्राक्ष सल्ला: काडी परिपक्वतेसाठी योग्य ती काळजी घ्या

Read Next

लिंबूवर्गीय पीक सल्ला: रसशोषक पतंग नियंत्रण उपाय