लिंबूवर्गीय पीक सल्ला: रसशोषक पतंग नियंत्रण उपाय

कृषिकिंग: या महिन्यात आंबिया बहारातील फळावर संत्रा रसशोषण करणारा पतंग व त्यामुळे होणारी फळगळ याचा उपद्रव संभवतो याकरिता गुळवेल, वासनवेल व चांदवेल इ. तणाचा नायनाट करावा. प्रकाश सापळ्याचा वापर करावा. (सायंकाळी 7 ते 11 दरम्यान) बागेत धूर करावा व प्रादुर्भाव दिसून येताच निंबोळी अर्क 5 टक्के किंवा निलतेल 100 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. बाहेत सडलेली फळे वेचून नष्ट करावी. पतंगांना आकर्षित करण्याकरिता विषारी आमिषे 25 झाडाकरिता एक (गुळ/फळाचा रस+विष) याप्रमाणे बागेत लावावे.

-डॉ.दिनेश ह.पैठणकर (प्रभारी अधिकारी) डॉ.योगेश इंगळे (कनिष्ठ वनस्पती रोग शास्त्रज्ञ)
अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प फळे डॉ.पं.दे.कृ.वि.अकोला.

Read Previous

वासरास खाद्य देतांना काळजी घ्या…

Read Next

वासरे ढेरपोटक होण्यामागची कारणे