लिंबूवर्गीय पीक सल्ला: फळगळ रोखण्यासाठी संजीवकांचा वापर

कृषिकिंग:  मृगबहारातील बुरशीजन्य व अन्नद्रव्य/संजीवक कमतरतेमुळे होणारी फळगळ रोखण्याकरिता एनएए 10 पीपीएम किंवा 2,4-डी 15 पीपीएम (1.5 ग्रॅम किंवा जीए 1.5 पीपीएम (1.5 ग्रॅम) + युरिया 1 टक्के (1 किलो)ची फवारणी करावी . मृगबहारातील संत्रा फळवाढीकरिता कॅल्शियम नायट्रेट 10 टक्के (10 ग्रॅम) प्रति लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी.
संत्रा/मोसंबी/लिंबूफळांची वाढ होण्याकरिता जिब्रेलिक अॅसिड 15 पीपीएम (1.5 ग्रॅम) किंवा 2,4-डी 15 पीपीएम (1.5 ग्रॅम) + मोनो पोटॅशियम फॉस्फेट 1 टक्के (1 किलो) 100 लीटर पाण्यात टाकून फवारणी करावी.
डॉ.दिनेश ह.पैठणकर (प्रभारी अधिकारी)
डॉ.योगेश इंगळे (कनिष्ठ वनस्पती रोग शास्त्रज्ञ)
अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प फळे डॉ.पं.दे.कृ.वि.अकोला

Read Previous

आजचे अंड्याचे दर- रु/शेकडा

Read Next

पावसाळ्यातील पशुव्यवस्थापन: खाद्य नियोजन