लिंबूवर्गीय पीक सल्ला: फळे काढणी व टिकवण

कृषिकिंग: आंबिया बहार फळे काढणीचे 15 दिवस अगोदर कार्बेन्डेझीम 0.1 टक्के किंवा बेनोमील 0.1 टक्के (10 ग्रॅम) + 10 लीटर पाण्यात टाकून फवारणी करावी. यामुळे फळे वाहतुकीत सडण्याचे प्रमाण कमी होते. आंबिया बहारातील फळे काढणी लांबवायची असल्यास/झाडावर अधिक काळ टिकवायची असल्यास जिब्रेलिक अॅसिड 15 पीपीएम (1.5 ग्रॅम) + युरिया (1 टक्के) 1 किलो + 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

-डॉ.दिनेश ह.पैठणकर (प्रभारी अधिकारी)
डॉ.योगेश इंगळे (कनिष्ठ वनस्पती रोग शास्त्रज्ञ)

Read Previous

हवामान बदलाच्या अभ्यासासाठी राज्य सरकार स्थापणार टास्क फोर्स

Read Next

संकरित गाय नोंदणी पद्धती