लिंबूवर्गीय पीक सल्ला: कीड व रोग नियंत्रण उपाय

कृषिकिंग: कागदी लिंबावर खैरया रोगाकरिता कॉपर ऑक्सीक्लोराईड 0.3 टक्के (30 ग्रॅम) + स्ट्रेप्टोसायक्लीन 100 पीपीएम (1 ग्रॅम) प्रती दहा लीटर पाण्यात टाकून फवारणी करावी. फळातील रस शोषण करणाऱ्या पुढील किडींचा प्रकोप टाळण्याकरिता बागेच्या भोवताल गुळवेल, वासनवेल, चांदवेल इ.तणांचा नायनाट करावा व धुरे तणमुक्त ठेवावे. कोळी किडीचा उपद्रव पाऊस उघडायच्या व ढगाळ वातावरण असतांना जास्त संभवतो याकरिता डायकोफॉल 18.5 टक्के प्रवाही 27 मिली 10 लीटर किंवा 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.

-डॉ.दिनेश ह.पैठणकर (प्रभारी अधिकारी) डॉ.योगेश इंगळे (कनिष्ठ वनस्पती रोग शास्त्रज्ञ)
अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प फळे. डॉ.पं.दे.कृ.वि.अकोला.

Read Previous

जनावरांच्या उत्तम प्रजोत्पादनासाठी आहार नियोजन महत्वाचे आहे

Read Next

आजचे अंड्याचे दर- रु/शेकडा