म्हशींच्या चाऱ्याची पौष्टिकता वाढवण्यासाठी प्रक्रियेची गरज

निकृष्ट चाऱ्याचे रूपांतर सकस व असलेल्या पोषणमूल्यांचा पूर्ण उपयोग करण्याकरिता चाऱ्यावर युरियाची प्रक्रिया केल्यास निकृष्ट चाऱ्याची पौष्टिकता वाढते. चाऱ्याची चव, पाचकता व त्यातील नत्राचे प्रमाण वाढते. त्यामुळे म्हशी चारा अावडीने खातात. 

म्हैसपालनामध्ये सर्वाधिक खर्च हा म्हशीच्या चारा व पशुखाद्यावर होतो. ग्रामीण भागात जनावरांसाठी शेतातील उत्पादित पिकाचा चारा म्हणून उपयोग केला जातो. उन्हाळ्यामध्ये प्रामुख्याने पाण्याच्या कमतरतेमुळे चारा घेणे अशक्‍य होते, या वेळेस म्हशींना फक्त उत्पादित पिकांचा वाळलेला चारा म्हणून उपयोग होतो. म्हैसपालकांचा म्हशीसाठी वेगळा चारा उत्पादित करण्याकडे कमी कल असतो. बाजारपेठेत तयार चाऱ्याची सरासरी १० ते १२ रु प्रतिकिलो दराने विक्री होते. परंतु, अशा चाऱ्याची गुणवत्ता चांगली असेलच याची खात्री नसते. यामुळे म्हशीच्या दूध उत्पादन व आरोग्यावर परिणाम होतो. 

*-डॉ. एम. व्ही. इंगवले 
स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला.*

Read Previous

पीक सल्ला: बटाटा लागवडीच्या वेळी योग्य खत मात्रा द्यावी

Read Next

कृषी क्षेत्रातील क्रांती