मार्केट ट्रेंड – कांद्याच्या बाजारभावात नरमाई

आज आपण कांदा बाजारभावाचा ट्रेंड जाणून घेणार आहोत.

देशभरातील प्रमुख बाजार समित्यांत कांदा बाजारभावात घसरण सुरू आहे. लेट खरीप म्हणजेच रांगडा कांद्याचा पुरवठा वाढत आहे. यामुळे बाजारभावात नरमाई दिसतेय. लासलगाव बाजार समितीतील सरासरी दरात सातत्याने घट होत आहे. तारीख 13 जानेवारी रोजी 2800 रुपये प्रतिक्विंटल सरासरी दराने लासलगाव बाजार समितीत लिलाव झाले आहेत.  रांगड्या कांद्याची प्रतिएकरी उत्पादकता 50 क्विंटलपर्यंत घटली आहे, अशा शेतकऱ्यांसाठी सध्याचा बाजारभाव फारसा किफायती ठरत नसल्याचे चित्र आहे.

Read Previous

निर्यातक्षम द्राक्षांना कवडीमोल भाव, शेतकऱ्यांचे कोटींचे नुकसान

Read Next

सरकार आणि शेतकरी संघटनामध्ये कृषीमंत्री घडवणार संवाद