माध्यमिक शिक्षकाच्या नोकरीसाठी कृषी पदवीधरही पात्र

कृषिकिंग: राज्यात माध्यमिक शिक्षकाच्या नोकरीसाठी कृषी पदवीधारक उमेदवारही पात्र ठरणार आहेत. माध्यमिक शिक्षकांच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदव्यांमध्ये सुधारणा करुन काही नव्या पदव्यांचा समावेश करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यात कृषी पदवीचा समावेश केल्याने राज्यातील हजारो कृषी पदवीधारकांना दिलासा मिळणार आहे.

यासंबंधीचा शाससनआदेश शालेय शिक्षण विभागातर्फे नुकताच जारी करण्यात आला. या निर्णयानुसार इयत्ता सहावी ते आठवीच्या शिक्षकांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हतेमधील मान्यताप्राप्त विद्यापीठाची भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, जीव विज्ञान, पर्यावरण शास्त्र विषयातील पदव्यांसोबतच सूक्ष्मजीव शास्त्र, जैवतंत्रज्ञान, जीवरसायन शास्त्र आणि कृषीशास्त्र या पदव्यांचाही समावेश करण्यात आला आहे. तसेच इयत्ता नववी व दहावी शिक्षकांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हतेमधील मान्यताप्राप्त विद्यापीठाची भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, जीव विज्ञान, पर्यावरण शास्त्र विषयातील पदव्यांसोबतच सूक्ष्मजीव शास्त्र, जैवतंत्रज्ञान, जीवरसायन शास्त्र आणि कृषीशास्त्र या पदव्यांचाही समावेश करण्यात आला आहे. त्याशिवाय इतरही काही विषयातील पदव्यांचा समावेश नव्या निर्णयात करण्यात आला आहे. त्यामुळे माध्यमिक शिक्षकांच्या नोकरीसाठी आता कृषी पदवीधारक उमेदवारही पात्र ठरणार आहेत. कृषी पदवीधारकांचा माध्यमिक शाळांच्या नोकरीतील प्रवेशाचा मार्ग मोकळा होणार आहे.

Read Previous

वायू चक्रीवादळाने दिशा बदलल्याने गुजरातला दिलासा

Read Next

इंटरनॅशनल फुड हब होण्याची भारताची क्षमता

Leave a Reply

Your email address will not be published.