भारतात कृषीमध्ये 5 लाखांहून अधिक चार्टर्ड अकाउंटंट्सची आवश्यकता

कृषिकिंग: 16 व्या चार्टर्ड अकाउंटंट्स परिषदेचे (सीएएस) -बंगलोर ,कर्नाटक येथे उद्घाटन करण्यात आले. माननीय पशुसंवर्धन व मत्स्यव्यवसाय मंत्री कर्नाटक राज्य श्री वेंकटराव नादागौडा यांच्यासह सीए जोमोन जॉर्ज, एसआयआरसी चे चेअरमन जोमोन जॉर्ज ह्यांच्या उपस्थितीत सेंट्रल कॉलेज कॅम्पस, पॅलेस रोड, बेंगलुरु येथे उद्घाटन झाले. दोन दिवसीय परिषदेचे आयोजन भारतीय चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाच्या बॅंगलोर शाखेद्वारे केले गेले. उद्घाटनानंतर बोलताना नडगोंडा म्हणाले की, सामान्य जनतेला जीएसटी आणि कृषी क्षेत्रातील इतर कर संबंधित समस्यांविषयी शिक्षित केले पाहिजे. भारतात कृषी सर्वात दुर्लक्षित क्षेत्र आहे. कृषी क्षेत्रामध्ये फक्त 2.8 लाख सीए सेवा देत आहेत आणि या क्षेत्रामध्ये 5 लाखांहून अधिक सीएची गरज आहे. शेतक-यांना शिक्षित करण्याची त्यांनी मागणी केली कारण शेतकरी बियाणे खरेदी करण्यापासून बाजारातील पूर्ण उत्पादनाची विक्री करण्यापासून स्वतंत्रपणे व्यवस्थापण करतात.गेल्या 15 वर्षांपासून कर्नाटकमध्ये मेगा कॉन्फरन्स होत आहे. यावर्षी कर्नाटक आणि इतर राज्यांमधील 1000 हून अधिक सीए कॉन्फरन्समध्ये उपस्थित होते.

Read Previous

पिककर्जासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दर सोमवारी बैठक घ्यावीः मुख्य सचिव

Read Next

ट्रम्पने भारताला विशेष व्यापार दर्जातून काढल्याने कीटकनाशके व्यापार प्रभावित ?