बंदिस्त शेळीपालनाचे फायदे

कृषिकिंग : शेळीपालन व्यवसाय व्यावसायिक स्वरुपात आणण्यासाठी बंदिस्त शेळीपालनाचे महत्व समजून घेणे गरजेचे आहे कारण बंदिस्त शेळीपालन होऊच शकत नाही असा बऱ्याच लोकांचा गैसमज आहे. बंदिस्त शेळीपालनाचे फायदे खालीलप्रमाणे आहेत.
१) शेळी हा प्राणी काटक आहे कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीतही तग धरू शकतो तसेच प्रथिनयुक्त खाद्यपदार्थ म्हणून शेळीपालन उद्योगास भरपूर वाव आहे.
२) शेळीपालन हा आजही घरगुती शेतकऱ्यांचा व्यवसाय असल्याने त्याला मोठे स्वरूप आलेले नाही म्हणून शेळ्यांच्या मासाला मागणी व किंमत असूनही पुरवठा कमी आहे.
३) शेळ्यांना पौष्टिक आहार देऊन योग्य ते रोग प्रतिबंधक व्यवस्थापन ठेवल्यास त्यांना सहसा रोग होत नाही व ८ ते १० महिन्यात शेळ्या गाभण राहू शकतात व १३ ते १४ महिन्यात दोन विते होतात.
४) शेळ्यांचे सर्व भाग जसे कातडी, पाय, शिंगे, खूर आणि खत उपयोगी असल्याने शेळीपालन हा मोठा उद्योग होऊ शकतो.
५) शेळ्यात स्वभावतः दोन करडे, तीन करडे व कधीकधी सहा करडे सुद्धा एका वेतात झालेली पाहण्यात येतात.
६) नवीन चारा उत्पादनास वाव तसेच रोजगार मिळविण्यासाठी गावात हा उद्योग फारच उपयोगी आहे.

-डॉ. गोविंदराव लोखंडे, माजी उपायुक्त, पशुसंवर्धन.

Read Previous

राज्य सरकार करणार पाकिस्तान मधून कांदा आयात

Read Next

भाजीपाला सल्ला: अशी करा पालक व मेथी लागवड