पूर्वहंगामी आणि आडसाली ऊस खत नियोजन

आडसाली ऊस
१) बांधणीच्या अवस्थेत असलेल्या आडसाली ऊसाला हेक्टरी १६० किलो नत्र (३४५ किलो युरिया), ८५ किलो स्फुरद (५३१ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) आणि ८५ किलो पालाश (१४२ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) खतमात्रा देऊन बांधणी करावी. को ८६०३२ या ऊस जातीसाठी २५ टक्के रासायनिक खत मात्रा वाढवून द्यावी.

पूर्वहंगामी ऊस
१) पूर्व हंगामी ऊसातील आंतरपिकाची फ्लॅवर, कोबी, मुळा, गाजर, कांदा व बटाटा इ. पिकांची काढणी त्यांची अवस्था पाहून करावी.
२) १२ ते १६ आठवडे झालेल्या ऊसाला नत्राचा तिसरा हप्ता द्यावा. यासाठी हेक्टरी ३४ किलो नत्र (७४ किलो युरिया) वापरावे, नत्रयुक्त खताबरोबर ६:१ या प्रमाणात निंबोळी पेंडीची भुकटी खतामध्ये मिसळून द्यावी.

-डॉ. प्रमोद चौधरी, डॉ. मृणाल अजोतीकर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव

स्त्रोत: कृषिकिंग द्वैमासिक डिसेंबर २०१७ जानेवारी २०१८

Read Previous

पशूंच्या आहारात सोयाबीनचा वापर

Read Next

द्राक्ष सल्ला: जुन्या द्राक्षबागेत असे करा पाणी आणि खत नियोजन