पीक सल्ला: बटाटा लागवडीच्या वेळी योग्य खत मात्रा द्यावी

कुफरी चंद्रमुखी, कुफरी ज्योती, कुफरी लवकर, कुफरी सिंधुरी या बटाट्याच्या उत्तम जाती आहेत. यांची लागवड जुलै महिन्यातही करता येते. लागवडीपूर्वी २५ ते ३० गाड्या शेणखत द्यावे. लागवडीचे वेळी बटाटा फोडी करतांना कोयता ०.३ टक्के बुरशीनाशकाचे द्रावणात बुडवून मगच फोडी कराव्यात. प्रत्येक फोडीवर २ डोळे राहतील याप्रमाणे काप घ्यावेत. हेक्टरी ५०:६०:१२० किलो नत्र, स्फुरद व पालाश खते सरीत द्यावी. लागवड ४५ × ३० सें. मी. अंतरावर करावी. 
*डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ* 

Read Previous

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!!

Read Next

म्हशींच्या चाऱ्याची पौष्टिकता वाढवण्यासाठी प्रक्रियेची गरज