पशूंच्या आहारात सोयाबीनचा वापर

कृषिकिंग : सोयाबीन व त्याच्या विविध उपपदार्थांचा उपयोग संतुलित आहारात चांगल्या प्रकारे करता येतो. सोयाबीन हे द्विदल प्रकारातील तेलबिया पीक असून त्यांत ४२ ते ४८ टक्के प्रथिने, १८ ते २० टक्के चरबी (तेल) व उत्तम प्रकारची अमिनो आम्ल, भरपूर खनिजे व जीवनसत्त्वे आहेत. अनेक घटकीय पशुखाद्यात याचा उपयोग १२ ते २१ टक्क्यांपर्यंत करता येतो.

सोयाबीन हे गरम असल्यामुळे ते खाद्य घातल्यास गाई/म्हशी/शेळ्या गाभटतात हा मोठा गैरसमज आहे. सोयाबीन गरम म्हणजे अतिशय पौष्टिक आहे कारण त्यात प्रथिने व चरबी (तेल) भरपूर आहे. कोणताही पौष्टीक पदार्थ प्रमाणाबाहेर दिला तर तो पचत नाही. न पचल्यामुळे त्यातून काही प्रकारची तीव्र रसायने तयार होऊन ती गर्भाशयाला मारक ठरतात. परंतु सोयाबीनवर प्रक्रिया करून ते खावयास दिले तर अजिबात धोका नाही. कच्चे सोयाबीन धोकादायक आहे.

सोयाबीन प्रक्रिया
सोयाबीनमधील तेल काढल्यावर राहिलेली पेंड फारच पौष्टिक असते. सोयाबीन भाजणे, शिजविणे, भिजवणे, वाफवणे, दाबयुक्त वाफवणे, दुसऱ्या एकदल दाण्याबरोबर मिश्रण करणे, काही रसायने मिश्रण करणे. अशा प्रकारच्या प्रक्रियेने सोयाबीनमध्ये अगदी थोड्या फार प्रमाणात जी अपोषक तत्त्वे असतात ती नाहीशी होतात.

-डॉ. वासुदेव सिधये, पशु व पक्षी रोग तज्ज्ञ.

Read Previous

असे करा रांगडा कांद्यावरील फुलकिडे व पानावरील रोगांचे नियंत्रण

Read Next

पूर्वहंगामी आणि आडसाली ऊस खत नियोजन