निकृष्ट चाऱ्यामुळे म्हशीवर होणारे परिणाम

कृषिकिंग : म्हशीसाठी चारा म्हणून गव्हांडा किंवा गव्हाचे तणस, भाताचा पेंढा, सोयाबीनचे कुटार, बाजरीचे सरमाड इ. घटकांचा प्रामुख्याने वापर होतो. परंतु, अशा चाऱ्यांची सकसता कमी असते, यातून पचनीय घटक कमी मिळतात.
म्हशीच्या वाढीवर, दूधउत्पादन, आरोग्य अाणि प्रजननावर विपरीत परिणाम जाणवतो. अशा चाऱ्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण कमी असते व पाचकताही अत्यल्प असते. यामुळे पोषणतत्त्वे कमी किंवा अत्यल्प प्रमाणात मिळतात.
निकृष्ट दर्जाच्या चाऱ्यामध्ये लिग्नो सेलुलोज कॉप्लेक्‍स असल्यामुळे रवंथ करणाऱ्या पोटामध्ये जिवाणूंची प्रक्रिया चाऱ्यावर न झाल्यामुळे याचे विघटन होत नाही व प्रथिने म्हशीच्या शरीरासाठी उपलब्ध होत नाहीत.
-डॉ. एम. व्ही. इंगवले.
स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला.

Read Previous

पीएम किसानः यंदा 10 कोटी शेतकऱ्यांना लाभ देणार

Read Next

कापूस सल्ला: नत्राचा तिसरा हप्ता देऊन कीडनियंत्रक उपाय करा