द्राक्ष सल्ला: योग्यवेळी अतिरिक्त फुटी काढून कीड व रोग प्रादुर्भाव टाळा

कृषिकिंग: रोगनियंत्रण: बागेत पाऊस जोरात सुरू असल्यास नविन फुटी जास्त प्रमाणात येतील व या कोवळ्या फुटींवर करपा या रोगाचा प्रादुर्भाव दिसेल. या फुटी वेळीच काढून टाकल्यास पुढील रोग टाळता येईल. जर पाऊस कमी झाल्यास किंवा बंद झाल्यास जुन्या झालेल्या कॅनॅापीमध्ये भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येईल. या कॅनॉपीमध्ये तयार झालेल्या रोगामुळे आतील कॅनॉपीपर्यंत रोगाचे जीवाणू रस शोषून घेऊन पाने गळतील व नाईलाजाने काडीची परिपक्वता सुद्धा झालेली नसेल व तसेच बागेत फळछाटणी सुद्धा वेळीच घ्यावी लागेल.

-डॉ. आर. जी. सोमकुंवर,
प्रमुख शास्त्रज्ञ, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे.

Read Previous

पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा शासननिर्णय जारी

Read Next

पिकविम्यावरून ठाकरे-फडणवीस यांच्यात कलगीतुरा