द्राक्ष सल्ला: काडी परिपक्वतेसाठी योग्य ती काळजी घ्या

कृषिकिंग: द्राक्षबागेतील सध्याची परिस्थिती पाहता लक्षात येईल की जुन्या बागेत आता काडीच्या परिपक्वतेचा कालावधी सुरू असून पाऊस सुद्धा तितक्याच प्रमाणात असतो. अशा परिस्थितीमध्ये खालील गोष्टींची काळजी घ्यावी.
काडीच्या परिपक्वतेकरिता बागेत कोरडे वातावरण आवश्यक असते. या वातावरणात शेंडा वाढ कमी होणे गरजेचे असते. परंतु जर बागेत पाऊस सुरू असेल किंवा ढगाळ वातावरण असल्यास फुटींची वाढ जोरात असेल व यामुळे काडीची परिपक्वता लांबणीवर जाईल. अशा परिस्थितीत शेंडे पिंचींग करावे परंतु जास्त प्रमाणात शेंडा खुडण्याचे टाळावे. फक्त टिकली मारल्यास वाढ थांबवल्यास मदत होईल. वेलीवरील प्रत्येक काडी ही तारेवर बांधून घ्यावी. यामुळे कॅनॉपी मोकळी राहून त्यामध्ये हवा खेळती राहील व त्याचाच परिणाम म्हणजे बागेत काडीची परिपक्वता लवकर करून घेण्यास मदत होईल.

-डॉ. आर. जी. सोमकुंवर,
प्रमुख शास्त्रज्ञ, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे.

Read Previous

वासरांच्या झपाट्याने वाढीसाठी प्रथिनांचे महत्व…

Read Next

वासरास खाद्य देतांना काळजी घ्या…