जन्मलेल्या कालवडीची घ्यावयाची काळजी

कृषिकिंग: जन्मलेल्या कालवडीचे नाक व कान स्वच्छ करून घ्यावे. कालवडीची नाळ दीड ते दोन इंच अंतरावर बांधून कापावी व त्यावर टिंक्चर आयोडीन लावावे. कालवडीच्या वजनाच्या १० ते १२ टक्के या प्रमाणात पहिला चिक तिला पाजावा. पहिल्या दोन तासांत एक लिटरपेक्षा जास्त चिक पाजावा. सुरुवातीच्या चिकात (दुधात) आयुष्यभराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे घटक असतात. म्हणून चिक पाजणे फार महत्वाचे असते. पहिले पाच महिने दर महिन्याला जंतांचे औषध पाजावे. त्यानंतर दर ३ महिन्यांनी जंतांचे औषध द्यावे. खनिजतत्वाचे मिश्रणदेखील रोजच्या खुराकात नियमितपणे द्यावे. यामुळे शरीराचा सर्वांगीण विकास होतो. वासरांना दुधाबरोबरच पाणीही द्यावे हळूहळू पाणी वाढवत जावे.

-डॉ. शैलेश मदने,
डेयरी फार्म सल्लागार.

Read Previous

साखर कारखान्यांच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पांना दिलासा

Read Next

उस उत्पादन घटल्याने यंदा राज्यात ५० हून अधिक कारखाने बंद राहण्याची शक्यता