जनावरांच्या व्यवस्थापनाचा दुधातील फॅट आणि डिग्रीवर होणारा परिणाम

कृषिकिंग: दुभत्या जनावरांचे व्यवस्थापन देखील दुधाची फॅट आणि डिग्रीच्या प्रमाणावर परिणाम करते. सलग दोन वेळा धार काढण्यामधील कालावधी वाढल्यास दूध जास्त मिळते परंतू फॅटचे प्रमाण कमी होते तर हा कालावधी कमी झाल्यास दूध उत्पादन कमी होऊन फॅटचे प्रमाण वाढते. जनावराच्या कासेतील दूध संपूर्ण काढल्यास फॅट कमी जास्त तर अपूर्ण काढल्यास कमी लागते. धारा काढण्याच्या वेळा सतत बदलल्यासही फॅट कमी लागते. वेतामध्ये जनावराचे दूध उत्पादन जसे वाढते तसे फॅट कमी होते तर उत्पादन कमी झाल्यास फॅट वाढते.वाढत्या वयानुसारही जनावरांच्या दूधातील फॅटचे प्रमाण घटते. विण्यावेळी जनावराची तब्बेत उत्तम असल्यास त्यापासून भरपूर दूध व जास्त फॅट मिळते. दूध काढतेवेळी कोणत्याही कारणाने जनावर घाबरल्यास दूध उत्पादन आणि फॅटचे प्रमाण घटते. वातावरणातील बदलानुसारही दुधातील फॅटचे प्रमाण बदलते.

-डॉ. एस.आर.कोल्हे
क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ. जि. सातारा.

Read Previous

शेती क्षेत्रातील बुडीत कर्जाचे प्रमाण वाढले

Read Next

कांदा सल्ला: काळा करपा रोगास प्रतिबंध करा