जनावरांच्या उत्तम प्रजोत्पादनासाठी आहार नियोजन महत्वाचे आहे

कृषिकिंग: जनावरांच्या आहारात निकृष्ट चाऱ्याचा वापर तसेच असंतुलित पशुखाद्य मिश्रण यामुळे जनावरांचे कुपोषण होते. जनावरांमधील कुपोषणामुळे जनावर वयात लवकर येत नाही तसेच माजावर लवकर येत नाही आणि वयस्कर जनावरांमध्ये अनियमित माज तसेच माजावर न येणे यासारखे प्रकार दिसून येतात. उर्जेच्या कमतरतेमुळे स्त्रीबीजाची वाढ नीट होत नाही तसेच प्रजननक्षमता कमी होते. जनावर वितेवेळी जर त्याचे आरोग्य चांगले नसेल तर असे जनावर लवकर माजावर येत नाहीत, माजावर आलीच तर गर्भधारणा होत नाही. कुपोषणामुळे वाढ न झालेल्या वासरांना जन्म देणे तसेच गर्भाशयामध्ये गर्भाचा मृत्यू होणे यासारख्या समस्या आढळतात. जनावर माजावर असताना आणि कृत्रिम रेतन केल्यानंतर शर्करेची कमतरता असेल तर गर्भधारणा व्यवस्थित होत नाही कारण शर्करेच्या कमतरतेमुळे शुक्रजंतूंना किंवा गर्भाला उर्जेची कमतरता निर्माण होते. जनावर व्यायल्यानंतर येणारा ताण नष्ट होऊन तसेच दुग्धोत्पादनासाठी लागणारी उर्जा यांची गरज भागून जनावरांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी त्यांना योग्य आहार देण्याची गरज असते.

– डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, डॉ. मत्स्यगंधा पाटील, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय उदगीर, लातूर.

Read Previous

पीक कापणी प्रयोग केवळ 60 ते 70 टक्के अचूक

Read Next

लिंबूवर्गीय पीक सल्ला: कीड व रोग नियंत्रण उपाय